मुंबई : नव्या वर्षात तीन खान असणाऱ्या चित्रपटात काम करण्याऐवजी मी स्वतःच्या लग्नात बिझी असेल असे खुद्द सुपरस्टार सलमान खान म्हटले आहे. सलमान खान मुंबई बिग स्टार इंटरटेन्मेट पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होता.
सलमानला यावेळी विचारण्यात आले की, २०१५ मध्ये तिन्ही खान सलमान, शाहरुख आणि आमिरच्या एकत्र एका चित्रपटात का करणार का?
त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, मी तिन्ही खान एकत्र फिल्ममध्ये दिसण्याऐवजी स्वतःचे लग्न होईल अशी इच्छा आहे.
सलमान खान येत्या जुलै महिन्यात करिना कपूरसोबत बजरंगी भाईजान चित्रपटात दिसणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.