'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान

'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.

Updated: Aug 11, 2015, 03:00 PM IST
'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान  title=

मुंबई: 'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.

एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार सलमान खान २०१४मध्ये आलेल्या किकच्या सिक्वेलमध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. सलमाननं वृत्तपत्राशी बोलतांना सांगितलं, 'मी फक्त साजिदला एक आयडिया दिलीय, आता तो चित्रपटावर काम करतोय. त्यात डबल रोल असेल. एकदा साजिद नाडियाडवाला स्क्रिप्ट आणि स्क्रीनप्लेसोबत तयार होईल, तर आम्ही पुढची तयारी सुरू करू.'

साजिदनं यावर सांगितलं, 'ही एक चांगली कथा असेल. २-३ महिन्यांत पटकथा पूर्ण होईल.'

तसं तर सलमानने 'जुडवा' आणि 'करन-अर्जुन' चित्रपटांमध्ये डबल रोल केलाय. तसंच सूरज बडजात्या यांच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो'मध्येही सलमान डबल रोलमध्ये दिसणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.