रिलीज पूर्वीच सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं रेकॉर्ड तोडणं सुरू!

सलमान खान हे नावच एखाद्या फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी काफी आहे. मग आता विचार करा सलमानच्या चित्रपटाबाबत काय होईल ज्यात तो डबल रोलमध्ये असेल आणि नाव असेल 'प्रेम'...

Updated: Oct 4, 2015, 02:20 PM IST
रिलीज पूर्वीच सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं रेकॉर्ड तोडणं सुरू! title=

मुंबई: सलमान खान हे नावच एखाद्या फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी काफी आहे. मग आता विचार करा सलमानच्या चित्रपटाबाबत काय होईल ज्यात तो डबल रोलमध्ये असेल आणि नाव असेल 'प्रेम'...

अनेक वर्षांनंतर सलमान खान पुन्हा सूरज बडजात्यांच्या चित्रपटात दिसतोय. सलमान आणि सोनम कपूरचा 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाच्या ट्रेलरनं रेकॉर्ड तोडलाय. 

आणखी वाचा - सलमान म्हणतो, सोनमपेक्षा ऐश्वर्यासोबत छान दिसत होतो

बॉलिवूडच्या मोस्ट व्यूजच्या लिस्टमध्ये सध्या हृतिक-सोनमचा 'धीरे धीरे' व्हिडिओ टॉपवर आहे. मात्र लॉन्चिंगच्या अवघ्या २४ तासांमध्येच 'प्रेम रतन धन पायो'नं याचा रेकॉर्ड तोडलाय. ट्रेलरला आतापर्यंत यूट्यूबवर ६१ लाखांहून अधिक व्यूज मिळाल्या आहेत आणि ऑफिशिअल पेज मिळून ही संख्या ८० लाखांहून अधिक आहे.

यापूर्वी 'धीरे धीरे' हे व्हिडिओ साँग आणि 'क्रिश-३' नं आपल्या ट्रेलरच्या लॉन्चिंगच्या २४ तासांत २१ लाखांहून अधिक हिट्स मिळवल्या होत्या. तर सलमानच्या 'किक'च्या ट्रेलरनं २४ तासांत १.८ मिलियन व्यूज मिळवले. पण 'प्रेम'च्या रुपात सलमानने सर्व रेकॉर्ड तोडलेत.

तब्बल १६ वर्षांनंतर सलमान खान सूरज बडजात्याच्या चित्रपटातून 'प्रेम'ही भूमिका साकारतोय. चित्रपटात सलमान सोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर, अनुपम खेर, नील नितिन मुकेश, अरमान कोहली आणि दीपक डोबरियाल प्रमुख भूमिकांमध्ये आहे. चित्रपट १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

तुम्ही ट्रेलर पाहिलाय - 

आणखी वाचा -  प्रेम इज बॅक; पाहा, 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.