सलमानला बनायचंय मराठी सिनेमाचा हिरो!

रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात दबंग सलमान खानला पाहुणा कलाकार म्हणून काम करताना तुम्ही पाहिलंच असेल... पण, आता खुद्द सलमान खानला मराठी सिनेमात काम करायची इच्छा झालीय... तेही सिनेमाचा हिरो म्हणून...

Updated: Sep 17, 2014, 04:27 PM IST
सलमानला बनायचंय मराठी सिनेमाचा हिरो! title=

मुंबई : रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात दबंग सलमान खानला पाहुणा कलाकार म्हणून काम करताना तुम्ही पाहिलंच असेल... पण, आता खुद्द सलमान खानला मराठी सिनेमात काम करायची इच्छा झालीय... तेही सिनेमाचा हिरो म्हणून...

नुकतंच ‘सांगतो ऐका’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. हे म्युझिक लॉन्च सलमानच्या हस्ते पार पडलं.

यावेळी, मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का? असा साहजिक प्रश्न त्याला विचारला गेला. तेव्हा, ‘हो... मला मराठी चित्रपटात प्रमूख भूमिका करण्याची इच्छा आहे’ असं सलमाननं मोकळेपणानं म्हटलंय. 

‘मला मराठी चित्रपट पाहयला आवडतात. प्रक्षेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता मराठी चित्रपटने उंच भरारी घेतलीय... प्रक्षेकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना जागरूक करण्याच कामदेखील हे सिनेमे करतात’ असं म्हणत सलमाननंही आपण मराठी सिनेमाचा फॅन असल्याचं दाखवून दिलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.