मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने लंडनमधील फॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवला. वसंत-ग्रीष्म 2015 या प्रदर्शनाच्या निमित्ताने फॅशन वीक भरवण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनुष्का उपस्थित होती.
लंडनमधील बीएफसी कोर्टयार्डमध्ये सोमवारी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. अनुष्का पुढच्या रांगेत बसली होती. अनुष्काचे प्रसिद्धी प्रबंधक यांनी तिच्या चाहत्यांसाठी फोटो ट्विटवर अपलोड केला आणि लिहिले लंडनमधील फॅशन शोमध्ये सहभागी झालेली अनुष्का.
अनुष्काने खास पोषाख परिधान केला होता. निळ्या रंगाचे झालर असलेला ड्रेस आणि बेल्ट तसेच छानसा स्कार्फ यामुळे अनुष्का उठून दिसत होती.
अनुष्का लवकरच अभिनेता अमिर खानबरोबर 'पीके' या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान, याच दरम्यान तिने निर्देशक जोया अख्तरचा सिनेमा 'दिल धडकने दो' याच्या शुटींगही करत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.