मुंबई : काही दिवसांपूर्वीच सलमान खानने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. पनवेल येथील फार्महाऊसवर बॉलीवूडचे अनेक कलाकार सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पोहोचले होते. लूलिया वंतूर ही देखील पूर्ण पार्टीत सलमानसोबतच वावरत होती.
खान कुटुंबियांचाच भाग असल्याप्रमाणे लूलिया पार्टीत वावरत होती. पण पार्टीत सलमान आणि लूलिया यांच्याच वाद झाला आणि सलमान तिच्यावर नाराज झाल्याचं वृत्त आहे.
पार्टीमध्ये लूलियाचं आलेल्या पाहुण्यांसोबत ओव्हर फ्रेंडली होणं आवडलं नाही. त्यामुळे त्यांच्यात या विषयावर वाद झाला. 'सलमानने पार्टी झाल्यानंतर लूलियाला नाराजी बोलून दाखवली'. असं पार्टीत उपस्थित लोकांनी सांगितलं.