सलमान म्हणतो, हे काम मला कधीच जमणार नाही

बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान त्याच्या अभिनयातून नेहमीच चर्चेत असतो. हिंदी सिनेमाचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान आत्मचरित्र लिहायला मात्र घाबरतो. आत्मचरित्र लिहणे हे खूप साहसाचं काम आहे आणि ते मला कधीच जमणार नाही असं तो म्हणतो.

Intern - | Updated: Apr 13, 2017, 01:19 PM IST
सलमान म्हणतो, हे काम मला कधीच जमणार नाही title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान त्याच्या अभिनयातून नेहमीच चर्चेत असतो. हिंदी सिनेमाचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान आत्मचरित्र लिहायला मात्र घाबरतो. आत्मचरित्र लिहणे हे खूप साहसाचं काम आहे आणि ते मला कधीच जमणार नाही असं तो म्हणतो.

अभिनेत्री आशा पारेख यांच्या 'द हिट गर्ल' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यावेळी तो म्हणाला 'मी या समारंभात सहभाग घेण्यास योग्य नाही. येथे काय बोलावं हेही मला सुचत नाही. आत्मचरित्र लिहणे हे बहादुरीचे काम आहे, आणि मला ते आयुष्यात कधीच जमणार नाही.'

आशा पारेख यांनी हे आत्मचरित्र प्रसिद्ध चित्रपट समीक्षक खालिद मोहम्मद यांच्या सोबत मिळून लिहले आहे. तर त्याची प्रस्तावना सलमाने लिहिली आहे. आशा पारेख यांनी त्याविषयी समारंभात सलमानचे आभार मानले.