मुंबई : टीव्हीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस १०'साठी अभिनेता सलमान खान जी फी आकारतो त्याबद्दल नेहमी चर्चा होत असते. सलमानची लोकप्रियता पाहून शोचे निर्माते गेल्या काही सिझनपासून सलमानलाच पसंती देतात.
तसेच बिग बॉससाठी सलमानला खूप मोठी रक्कम फी म्हणून दिली जाते. पण यंदा बिग बॉस १० च्या मिळणाऱ्या फी बद्दल सलमानने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार सलमानने या शोपासून मिळणाऱ्या फीचा काही हिस्सा बिइंग ह्युमन या सामाजिक संस्थेच्या खात्यात जमा करण्यास निर्मात्यांना सांगितले आहे. नेहमी बिग बॉससाठी सलमानने फी वाढवली आहे. पण यंदा यात घट होणार असून त्यातील एक हिस्सा बिइंग ह्युमनच्या खात्यात टाकला जाणार आहे.
सलमान आपल्या वाढत्या वयानुसार समाजसेवेच्या कार्यात अधिक इंटरेस्ट दाखवत असल्याचे यातून दिसत आहे.