मुंबई : अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता ऋतिक रोशन हे सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘बँग बँग’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान, एक छोटी चूक कतरिनाला भारी पडणार होती... पण, ते थोडक्यावरच निभावलं...
कतरिना गंभीर जखमी होण्यापासून थोडक्यात वाचलीय. चित्रपटात एक अॅक्शन सीन करताना कॅट जखमी झाली असती मात्र थोडक्यात वाचली...
त्याचं झालं असं, 1 जुलै रोजी मुंबईमधल्या गोरेगाव स्टुडिओमध्ये चित्रपटाचं शुटींग सुरु होतं... ऋतिक आणि कॅट अॅक्शन सीनसाठी तयार होते... त्या सिनमध्ये ऋतिक आपल्या अभिनेत्रीला म्हणजेच कॅटला वाचवत असत असतो... शूटींग सुरू झालं... मात्र, त्यावेळी शूट करताना थोडी चूक झाली आणि ऋतिकचा हाताचा कोपर कतरिनाच्या गालावर आदळला...
या घटनेनंतर थोड्यावेळासाठी कॅटचा गालही सूजलेला होता. मग काय, हेच निमित्त झालं आणि पूर्ण दिवस शुटींग रद्द करावी लागल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटची इजा किरकोळ होती आणि संध्याकाळपर्यंत तिचा गाल ठिकठाकही झाला होता.
दिग्दर्शिक सिद्धार्थ आनंदचा बँग-बँग हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. ऋतिक-कतरिनासोबत बिपाशू बासू, डॅनी डेन्जोंगपा आणि जावेद जाफरी यांच्यादेखील या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.