सलमान खान हे गिफ्ट पाहून बर्थडे पार्टीत ढसाढसा रडला

बॉलीवूडचा दबंग सलमान खानने पनवेल येथील फार्म हाऊसवर आपला ५० वा वाढदिवस साजरा केला.

Updated: Dec 28, 2015, 08:36 PM IST
सलमान खान हे गिफ्ट पाहून बर्थडे पार्टीत ढसाढसा रडला title=

मुंबई : बॉलीवूडचा दबंग सलमान खानने  पनवेल येथील फार्म हाऊसवर आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्थडे पार्टीला अवघं बॉलीवूड अवतरलं होतं.

सलमानच्या पार्टीत उपस्थित नसणाऱ्या एका अभिनेत्याचं गिफ्ट पाहून मात्र सलमानला अश्रू अनावर झाले. काय होतं ते गिफ्ट आणि कोणी पाठवलं होतं ते गिफ्ट ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

सलमानच्या कुटुंबियांनी त्याच्यासाठी एक खास गिफ्ट तयार केलं होतं. खान कुटुंबियांनी १ तासाचा व्हिडिओ तयार केला होता. ज्यामध्ये सलमानच्या सर्व खास मित्रांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या पाठवल्या. ज्यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सुरज पंचोली अशा कलाकारांचा समावेश होता. पण त्याच्या एका मित्राचा जेव्हा व्हिडिओत त्याने मॅसेज पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि सलमान तेथून निघून गेला.

कोणाच्या शुभेच्या असतील त्या ? ज्यामुळे सलमानला अश्रू अनावर झाले. संजय दत्त हा तो व्यक्ती आहे ज्यामुळे सलमानला रडू कोसळलं. संजय दत्त सध्या शिक्षा भोगत आहे. अशा वेळेतही त्याने सलमानसाठी स्पेशल शुभेच्या पाठवल्या त्यापाहून सलमानला रडू आलं.