मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान आता ५० वर्षाचा झाला आहे, मैने प्यार किया हा १९८९ साली चित्रपट हिट झाल्यानंतर सलमान हिरो म्हणून ओळखला जावू लागला, सलमानची यशस्वी घौडदौड आज २६ वर्षानंतरही सुरूच आहे.
सलमानचा पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' १९८८ मध्ये आला होता, त्यात तो सहाय्यक भूमिकेत होता.
वाचा सलमानविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी
१) सलमान आणि मोहनीश बहलला म्हणजेच नूतन यांचा मुलगा मोहनीशला ऑडिशनसाठी बोलवलं. यानंतर सलमान हिरो, मोहनीशला व्हिलनची भूमिका मिळाली, यानंतर हे दोनही जण हम आपके है कौन, आणि हम साथ-साथ है मध्ये दिसले.
२) सलमान खानला अब्बास मस्तानने बाजीगरसाठी लीड रोल ऑफर केला होता. मात्र सलमानने भूमिका नाकारल्याने शाहरूख खानला ही भूमिका देण्यात आली, अॅण्टी हिरोची भूमिका म्हणून शाहरूखला यात मोठं यश मोठं मिळालं.
३)सलमान खान अभिनय करण्याऐवजी त्यांच्या वडिलांप्रमाणे स्किप्ट रायटर होऊ इच्छीत होता, सलमानने वीर, चंद्रमुखी, बागी सारख्या चित्रपटांसाठी स्क्रीप्ट लिहिली.
४) येण्याआधी सलमानला पोहण्याची आवड होती, शाळेत असताना तो पोहण्याच्या टीममध्ये होता, जर सलमान चित्रपटात आला नसता, तर पोहण्यात सलमानने खेळाडू म्हणून करिअर करण्याचा प्रयत्न केला असता.
५) सलमान खानला साबणांचा मोठा छंद आहे, सलमानच्या बाथरूममध्ये जगभरातीत तमाम साबणाचं कलेक्शन आहे.
६) इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जगातही सलमान खानचा ईमेल आयडी नाहीय. सलमान म्हणतो की त्याला ईमेलची गरज पडत नाही, तो सरळ फोनवर बोलतो.
७) सलमानला बुटांची जाहिरात करताना तुम्ही पाहिला असेलही पण सलमानला अनवाणी चालणं खूप आवडतं.
८) सलमान खान त्याच्या चित्रपटांचा रिव्ह्यूव कधीच वाचत नाही.
९) सलमान खानला चायनीज आवडतं आणि पेटिंग करण्याचाही त्याला छंद आहे.
१०) सलमान नेहमी आपल्या हातात फिरोजा दगड असलेला ब्रेसलेट वापरतो, त्याचे वडिल सलीम खानही असं ब्रेसलेट वापरत होते.