सुल्तानकडून ‘रूस्तम’चं प्रमोशन

12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या रूस्तमचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. सलमान खाननेही प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय.

Updated: Aug 4, 2016, 12:47 PM IST
सुल्तानकडून ‘रूस्तम’चं प्रमोशन title=

मुंबई : 12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या रूस्तमचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. सलमान खाननेही प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय.

यासाठी त्याने ट्विटरवर एक १२ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने अक्षय कुमारचा उल्लेख ‘रूस्तम-ए-हिंद’ असा केला आहे. “फिल्म इंडस्ट्रीच्या ‘रूस्तम-ए-हिंद’चा सिनेमा येत आहे. नाव आहे रूस्तम. 12 ऑगस्टला सिनेमागृहात जाऊन अक्षय कुमारचा रूस्तम नक्की पाहा” असं सलमानने व्हिडिओमध्ये म्हटलंय.

या फिल्ममध्ये अक्षयने कमांडर रूस्तम वापरी यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री इलियाना डिक्रूज अक्षयची पत्नी म्हणून दिसेल. १९५९ च्या केएम नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणावर आधारीत ही फिल्म आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित रूस्तमची निर्मिती नीरज पांडे यांनी केली आहे. सलमानच्या या व्हिडिओला अक्षयनेही ट्विट करून प्रतिसाद दिला आहे