मिलिंद सोमनची ७५ वर्षीय आईही धावतेय अनवाणी

मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे... पण, आता मात्र मिलिंदहून जास्त चर्चेत आलीय ती त्यांची आई... 

Updated: Aug 4, 2016, 12:10 PM IST
मिलिंद सोमनची ७५ वर्षीय आईही धावतेय अनवाणी  title=

मुंबई : मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे... पण, आता मात्र मिलिंदहून जास्त चर्चेत आलीय ती त्यांची आई... 

तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या 'द ग्रेट इंडिया रन' मॅरेथॉनमध्ये मिलिंद अनवाणी सहभागी झालाय. ही मॅरेथॉन अहमदाबादहून मुंबईपर्यंत सुरू राहील. ही मॅरेथॉन संपवून ४ ऑगस्टपर्यंत मिलिंद मुंबईत दाखल होणार आहे. 

मिलिंदच्या या प्रवासात त्याला कुठल्याही प्रेरणेची गरज भासणार नाही... कारण, त्याची प्रेरणा खुद्द त्याच्यासोबत धावतेय. 

मिलिंदची ही प्रेरणा आहे आहे त्याची ७५ वर्षीय आई ऊषा सोमन... या वयातही ऊषा मॅरेथॉनच्या शेवटच्या टप्प्यात सहभागी झाल्यात. 

आपल्या मुलाप्रमाणेच ऊषाही अनवाणी मॅरेथॉनमध्ये धावताना दिसत आहेत. ऊषा यांची ही काही पहिली वेळ नाही... याआधीही त्या अनेक सामाजिक कार्यक्रमांत सहभागी झाल्यात. 

२०१४ साली एका सामाजिक उद्देशासाठी त्या जवळपास ४८ तासांत १०० किलोमीटर पायी चालल्या होत्या.