हिट अँड रन प्रकरणी सलमान सुटणार? आज निकाल?

हिट अँड रन खटल्यात सलमान खानची आज सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सलमानच्या ड्रायव्हरनं कोर्टात स्वत:च गाडी चालवत असल्याची जबाब नोंदवलाय. 

Updated: Apr 6, 2015, 08:50 AM IST
हिट अँड रन प्रकरणी सलमान सुटणार? आज निकाल? title=

मुंबई: हिट अँड रन खटल्यात सलमान खानची आज सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सलमानच्या ड्रायव्हरनं कोर्टात स्वत:च गाडी चालवत असल्याची जबाब नोंदवलाय. 

अशोक सिंहनं आपण स्वत: गाडी चालवत असल्याची कबुली देत टायर फुटल्यामुळं गाडी अनियंत्रित झाल्याचंही आपल्या जबाबात नोंदवलंय. तसंच अपघात झाल्यानंतर सलमाननंच पोलिसांना फोन करण्यास सांगितल्याचंही अशोक सिंह यानं कोर्टात आपल्या जबाबात म्हटलंय.

२८ सप्टेंबर २००२ रोजी सलमान खानच्या लँड क्रूझर गाडीनं वांद्रे इथल्या अमेरिकन बेकरीच्या फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं होतं. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी आपण गाडी चालवत नव्हतो तर आपला ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता, असं सलमान खाननं कोर्टात सांगितलं. 

शिवाय दुर्घटना घडण्याच्या आधी आपण दारू प्यायलो नसल्याचंही, सलमाननं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे आता ड्रायव्हरच्या जबानीनंतर कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.