'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमाननं फी विना केलं काम

दिवाळीच्या मुहूर्तावर अवघं बॉलिवूड आणि सलमानचे फॅन्स 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सलमाननं या चित्रपटासाठी कोणतीही फी घेतली नाहीय. 

Updated: Oct 22, 2015, 05:28 PM IST
'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमाननं फी विना केलं काम title=

मुंबई: दिवाळीच्या मुहूर्तावर अवघं बॉलिवूड आणि सलमानचे फॅन्स 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सलमाननं या चित्रपटासाठी कोणतीही फी घेतली नाहीय. 

सांगण्यात येतंय की, सलमान खाननं सूरज बडजात्याकडून कोणचीही फीस घेतली नाही. कदाचित फिल्म रिलीज झाल्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा काही भाग तो घेईल.

आणखी वाचा - 'प्रेम रतन धन पायो'चं नवीन गाणं 'जल्ते दिल' रिलीज

रिपोर्टनुसार पहिल्याच भेटीत सलमाननं सूरज बडजात्यांना सागितलं की, ते चित्रपटासाठी एकही रुपया घेणार नाही. मात्र चित्रपटाच्या प्रॉफिटचा काही भाग तो घेईल. मात्र प्रॉफिटमधील किती भाग सलमान घेईल हे अजून स्पष्ट झालं नाही. 

१२ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. सलमान खान रोमँटिक भूमिकेत सोनम कपूर सोबत दिसणार आहे. 

आणखी वाचा - व्हिडिओ: पाहा PRDP गाण्यातील सलमान-सोनमची रोमँटिक केमेस्ट्री

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.