सलमान, शाहरुख देखील घेतात या मुलाची अपॉईंटमेंट

शाहरुख आणि सलमान देखील एका मुलाला भेटण्यासाठी त्याची अपॉईंटमेंट घेतात

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jul 19, 2016, 07:46 PM IST
सलमान, शाहरुख देखील घेतात या मुलाची अपॉईंटमेंट title=

मुंबई : भारतात सलमान किंवा शाहरुख खानला भेटण्यासाठी अनेक जणांना शक्य होत नाही. अनेक बॉलिवूड कलाकारांनाही हे शक्य होत नाही पण जर तुम्हाला हे माहित पडलं की शाहरुख आणि सलमान देखील एका मुलाला भेटण्यासाठी त्याची अपॉईंटमेंट घेतात तर...? 

दुबईमधील एका १४ वर्षाच्या मुलाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. या मुलाचं नाव राशिद सईद बेल्हासा असं आहे. जो त्याच्या ऐशोआराम लाईफमुळे प्रसिद्ध आहे. हा मुलगा शाहरुख खान, सलमान खान सारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटीजला भेटला आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की सेलिब्रिटी याला भेटण्यासाठी त्याची अपॉईंटमेंट घेतात.

राशिद हा एक उद्योजगाचा मुलगा आहे. फॅशन लॉनचा हा को-ओनर आहे. जेथे स्टार आपले फॅशनेबल ड्रेस विकत घेतात. राशिदचे पिता सेफ अहमद बेल्हासा दुबईमधील बिझनेसमॅन आहेत. राशिद सलमान खान, शाहरुख खान, जॅकी चॅन, मेसी, रफ्तार, रोनाल्डो या सारख्या दिग्गजांना देखील भेटला आहे. राशिद इंस्टाग्रामवर आरएसबेल्हासा (rsbelhasa) आणि यूट्यूबवर मनी किक्सच्या नावाने ओळखला जातो.

राशिदच्या घरात एक प्राणासंग्रालय देखील आहे ज्यामध्ये बंगालचे वाघ, आफ्रीकन वाघ देखील आहेत शिवाय माकडं देखील आहेत. येथे जॅकी चॅनने त्याच्या सिनेमाची शूटींग देखील केली आहे. याला दुबईचा इंस्टाग्राम स्टार देखील म्हटलं जातं.