मुंबई : ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांचे नातेसंबंध पूर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत... हे खुद्द ऋषी कपूर यांनी कबूल केलंय.
एका वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर यांनी आपल्या आणि आपल्या मुलाच्या म्हणजेच रणबीर कपूरच्या नात्यावर पहिल्यांदाच जाहीरपणे बोललेत. सध्या आपले आणि माझ्या मुलामध्ये नातं बिघडल्याचं ऋषी कपूर यांनी म्हटलंय.
आपल्या आपल्या मुलाशी नातं तोडल्याचं आणि खूपच खराब केल्याचं ऋषी कपूर यांनी म्हटलंय. माझ्या पत्नीनं मला खूप सांगण्याचा प्रयत्न केला की मी काय करतोय पण आता खूप उशीर झालाय. आम्ही दोघंही या बदलांनुसार स्वत:मध्ये बदल करू शकलेलो नाहीत.
कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या 'लिव्ह इन रिलेशन'शीपमध्ये राहण्यासंबंधीच्या चर्चेनंतर ऋषी कपूर यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. रणबीर-कतरीनाच्या नातं ऋषी कपूर यांना मान्य नसल्याची याआधीही चर्चा सुरू होती.
मला माझ्या वडिलांनी स्वातंत्र्य दिलं होतं... तसंच मी रणबीरलाही स्वातंत्र्य दिलं जेव्हा त्यानं त्याच्या मैत्रिणीसोबत राहण्याचा निर्णय घेतला, असं म्हणताना रणबीर-कतरीनाच्या नात्यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केलंय.
ऋषी कपूर यांच्यातला पिता म्हणतो, रणबीर एक खूप चांगला मुलगा आहे. तो आपल्या पित्याची प्रत्येक गोष्ट ऐकतो... पण आम्ही एकमेकांच्या करिअरमध्ये हस्तक्षेप करत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
Son of a famous Father,Father of a famous Son. That leaves me no where! (एका प्रसिद्ध पित्याचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा पिता... त्यात मी कुठेही नाही!) असं आपली ओळख ऋषी कपूर यांचं ट्विटरवरच्या आपल्या पेजवर लिहिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.