अनुष्का शर्मा बनली वधू!

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्का शर्मावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यामध्येच एक बातमी आली की अनुष्का शर्मा वधू होणार आहे. पण ती आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीसाठी वधू होणार नसून एका जाहिरातीसाठी वधूची भूमिका करणार आहे. 

Updated: Mar 27, 2015, 08:50 PM IST
अनुष्का शर्मा बनली वधू! title=

नवी दिल्ली : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्का शर्मावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यामध्येच एक बातमी आली की अनुष्का शर्मा वधू होणार आहे. पण ती आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीसाठी वधू होणार नसून एका जाहिरातीसाठी वधूची भूमिका करणार आहे. 

अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वी वधूच्या वेशात दिसली होती. अनुष्काने हे शुटिंग एका कोल्डड्रिंकच्या जाहिरातीसाठी केलं होतं. अनुष्काने चित्रपट दिग्दर्शन विकास बहल यांच्या दिग्दर्शनात या जाहिरातीचं शुटिंग केलं आहे. 

अनुष्काने जाहिरातीबद्दल बोलताना सांगितले की, या जाहिरातीत माझा लूक आकर्षक आणि रचनात्मक आहे. जाहिरात मजेशीर आहे. त्याला माझा ड्रेस मॅच करतो. 

एका लग्न समारंभाच्या पार्श्वभूमी जाहिरात शूट करणे मला आवडते असे विकास बहल यांनी सांगितले. ही जाहिरात गेल्या महिन्यात अॅडिलेडमध्ये चित्रित करण्यात आली. ही जाहिरात शुक्रवारपासून विविध चॅनल्सवर दिसणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.