नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर नाराजी जाहीर केली आहे. सोबतच तिने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना प्रश्न देखील केला आहे.
रवीना टंडनने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना टॅग करत तिघांना प्रश्न विचारला आहे. तिने म्हटलं आहे की, 'काय आपण बसून जाधवला मरतांना बघणार आहोत ?'
Are we just going to sit and watch jadhav die?? @narendramodi @SushmaSwaraj @rajnathsingh
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 13, 2017