मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शन संजय लीला भंसाळी या शुक्रवारी आपल्या आगामी चित्रपट मर्दानी आणि मेरी कोमच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये येणार आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राणी आणि भंसाळी शुक्रवारी कॉमेडी नाइट्ससाठी वेगवेगळ्या भागांसाठी शुटिंग करीत आहे. शो मध्ये राणी आणि भंसाळी यांची पहिल्यादाच सहभागी होणार आहे.
मर्दानी आणि मेरी कोम यांना जोडणारा दुवा म्हणजे या दोन्ही महिला शक्तीला समर्पित काहण्या आहेत.
मर्दानी यात राणी मुखर्जी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे, तर मेरी कोम राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्री प्रियंका चोपडा ही सुप्रसिद्ध बॉक्सर एम. सी. मेरी कोमच्या भूमिकेत दिसणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.