न्यूयॉर्क : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्याच्या मागणीवर अभिनेत्री प्रियंका चोप्राने नाराजी व्यक्त केलीये.
गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्याच्या मागणीचा जोर वाढलाय. मनसेने तर त्यांना भारत सोडण्यासाठी अल्टिमेटम दिले होते.
यावर नाराजी व्यक्त करताना प्रियंका म्हणाली नेहमी, कलाकार, अभिनेत्यांना याप्रकऱणात ओढले जाते. आमच्यासोबतच असे का होते? अभिनेतांच्या व्यतिरिक्त व्यापारी, डॉक्टर तसेच राजकारण्यासोबत का होत नाही? असा सवाल प्रियंकाने उपस्थित केलाय.
प्रियंका पुढे म्हणाली, दुसरी गोष्ट म्हणजे मी देशभक्त आहे. यासाठी देश सुरक्षित राहण्यासाठी आमचे सरकार जो निर्णय घेईल मी त्यानिर्णयासोबत असेन. मात्र त्याचबरोबर जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्याविरोधात लढण्यापेक्षा कलाकारांना का निशाणा बनवला जात आहे.