प्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं!

सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली असली तरी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी डोकेदुखी ठरल्याचं अनेकांनी थिएटर बाहेर निघाल्यानंतर म्हटलंय. का घडलंय असं... त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Updated: Nov 12, 2015, 10:28 PM IST
प्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं! title=

मुंबई : सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली असली तरी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी डोकेदुखी ठरल्याचं अनेकांनी थिएटर बाहेर निघाल्यानंतर म्हटलंय. का घडलंय असं... त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं!

१. तब्बल तीन तास रटाळवाण्या पद्धतीनं सुरू असलेला हा सिनेमा तुम्हाला कंटाळवाणा वाटू शकतो... थिएटरमध्ये एक झोप तुम्ही काढू शकता.

२. हा सिनेमा ८० - ९० च्या शतकातल्या सिनेमांसारखा दिसतो. सिनेमाचं कथानक खूप रटाळवाण्या पद्धतीनं पुढे सरकतं.

अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो : पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे

३.  सलमान खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर यांसारखे स्टार कलाकार असूनदेखील त्यांचा अभिनयात प्रेक्षकांना धरून ठेवण्याची क्षमता दिसत नाही. 

४. ज्या सलमानच्या खांद्यावर विश्वास टाकून इतका सगळा पैसा या सिनेमावर लावण्यात आलाय तो सलमान खानदेखील या सिनेमात खूप फिका पडलाय. त्याचा अभिनय त्याचा याआधी आलेला सिनेमा 'बजरंगी भाईजान'पेक्षाही पडलेला आहे. 

५. सिनेमात नील नितीन मुकेश आणि अरमान कोहली यांच्याही भूमिका आहेत... पण, ते या सिनेमास्ट गेस्ट अपिअरन्स करतायत की काय असंही तुम्हाला वाटू शकतं. 

अधिक वाचा - Film review : 'प्रेम रतन धन पायो': कहाणी फिकी राहिली...

६. सिनेमाचं संगीतही प्रेक्षकांवर घट्ट पकड ठेवू शकलेलं नाही. अत्यंत धीम्या गतीनं सुरू असलेल्या या सिनेमात तब्बल १० गाणी आहेत.. आणि ही सगळी गाणी संगीतकार हिमेश रेशमियानं संगीतबद्ध केलेत. हे गाणे सिनेमात जबरदस्तीनं घुसडलेले आहेत.

७. लार्जर दॅन लाईफ असलेल्या या सिनेमात भव्य सेटस् आणि इतर सर्व भव्य दिव्य गोष्टी वापरल्यात... पण त्यात जिवंतपणा मात्र भरायला निर्माते विसरलेत.

८. राजश्री प्रोडक्शनचा एक कौटुंबिक सिनेमा असलेल्या या सिनेमाला कधी थ्रिलर, कधी लव्ह स्टोरी तर कधी आणखी काही बनवण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय... एकूणच काय तर फिल्मी मसाला थोडा अधिकच भरला गेलाय. 

अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो'चा ट्विट रिव्ह्यू

९. सिनेमात सलमानचा डबल रोल वापरला गेलाय. परंतु, अनेक सीन्स पाहताना तुम्ही आपण थिएटरमध्ये का आलो, असाच विचार करत राहाल. 

१०. सुरज बडजात्या निर्मित या सिनेमात अनेक चेहरे दिसतात... पण, त्यांचं काम मात्र दिसत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.