तुम्हीही बनू शकता पूनम पांडेच्या सिनेमाचे हिरो!

पूनम पांडेने 'नशा' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र नशा सिनेमा प्रेक्षकांना फारशा पसंतीला उतरला नाही. मात्र पूनम आता तिच्या आगामी सिनेमा 'हेलन'साठी तयार झाली आहे. या सिनेमात पूनम पांडेचे हिरो तुम्हीही बनू शकता.

Updated: Apr 9, 2015, 06:58 PM IST
तुम्हीही बनू शकता पूनम पांडेच्या सिनेमाचे हिरो! title=

मुंबई : पूनम पांडेने 'नशा' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र नशा सिनेमा प्रेक्षकांना फारशा पसंतीला उतरला नाही. मात्र पूनम आता तिच्या आगामी सिनेमा 'हेलन'साठी तयार झाली आहे. या सिनेमात पूनम पांडेचे हिरो तुम्हीही बनू शकता.

या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी हिरोचा शोध सुरू आहे. तुम्हीही या सिनेमाचे हिरो बनू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीच्या सीनचा व्हिडिओ बनवून ट्विटरद्वारे सिनेमाशी जोडलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायचा आहे. जर तो त्यांना आवडला तर तुम्हाल पुनमसोबत काम करण्याची संधी मिळू शकते.

हा सिनेमा अजित राजपाल दिग्दर्शित करणार आहे. एक हजारपेक्षा जास्त अॅक्टर आणि मॉडल्सच्या या सिनेमासाठी ऑडिशन घेण्यात आल्या आहेत. मात्र हवा तसा हिरो त्यांना अजून मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी आता ट्विटरचा सहारा घेतला आहे. ही आयडीया पूनमचीच आहे. कारण सोशल नेटवर्किंग साइटवर ती जास्त अॅक्टीव्ह असते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.