'पीके'ची दुसऱ्या दिवसाची कमाई ५० कोटी!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या पीके चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय, या चित्रपटाची कमाई दुसऱ्यादिवशी ५० कोटी रूपयांवर जाऊन पोहोचली आहे.

Updated: Dec 21, 2014, 07:45 PM IST
'पीके'ची दुसऱ्या दिवसाची कमाई ५० कोटी! title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या पीके चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय, या चित्रपटाची कमाई दुसऱ्यादिवशी ५० कोटी रूपयांवर जाऊन पोहोचली आहे.

हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला, मात्र अनेकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. पीके हा वर्षभरातील असा चौथा चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रूपयांची कमाई केलीय. पहिल्या दिवशी हा चित्रपट २६ कोटी रूपयांवर होता, मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई ५० कोटीच्या वर गेली आहे.

आमीरसह अनुष्का शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आमीरने अतिशय वेगळी भूमिका साकारली आहे. आमीरच्या भूमिकेच्या विविध छटा, अजय-अतूलचं संगीत, स्वानंद किरकिरे यांनी लिहलेली गाणी याची मेजवानी प्रेक्षकांना पीकेच्या निमित्ताने मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.