'पिकू' सिनेमाचं यश पाहून परिणितीला होतोय पश्चाताप

 अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर 'पिकू' सिनेमा वडील-मुलीच्या नात्यावर आधारीत आहे. 'पिकू' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत आहे. मात्र एक अभिनेत्री आहे, तिला या सिनेमाचं यश पाहून पश्चाताप होत आहे.

Updated: May 18, 2015, 03:45 PM IST
'पिकू' सिनेमाचं यश पाहून परिणितीला होतोय पश्चाताप title=

मुंबई:  अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर 'पिकू' सिनेमा वडील-मुलीच्या नात्यावर आधारीत आहे. 'पिकू' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत आहे. मात्र एक अभिनेत्री आहे, तिला या सिनेमाचं यश पाहून पश्चाताप होत आहे.

'पिकू' सिनेमाला लोकांकडून चांगली पंसती मिळत आहे. मात्र परिणिती चोप्राला मात्र वाईट वाटत असेल. कारण या सिनेमाची ऑफर दीपिका आधी परिणितीला देण्यात आली होती. मात्र त्यावेळी परिणितीने या ऑफरला नकार दिला होता. परिणिती त्यावेळी यश बॅनरच्या 'दावत-ए-इश्क' या सिनेमात व्यस्त होती. 

परिणिती या सिनेमाची ऑफर नाकारल्यानंतर हा सिनेमा दीपिकाकडे आला आणि लोकांच्या पसंतीलाही उतरला. त्यामुळे 'पिकू' सिनेमाला नकार देण्याचा चूकिचा निर्णय परिणितीच्या चांगलाच जिव्हारी लागला असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.