नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खाननं लग्नाचा विचार आता सोडून दिलाय की काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडावा असंच सलमानची सध्याची वक्तव्यं ऐकली की वाटतं...
राजकारणामध्ये जायचंय का? तर नाही... सलमान खानची राजकारणामध्येही जाण्याची कोणतीही योजना नाही... तर त्याला आपल्या सामाजिक कार्यावर जास्त लक्ष द्यायचंय.
दूरदर्शनचे मनोज तिबरवाल आकाश यांना दिलेल्या एका मुलाखतीत 48 वर्षीय अभिनेत्यानं म्हटलंय की, तो आपल्या 'बिइंग ह्युमन' संघटनेच्या वतीनं सामाजिक कार्यात सहभागी होत राहील.
काही ठिकाणांना दत्तक घेण्याची योजना सलमाननं बनवतोय... इथं राहणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी त्याला काहीतरी काम करायचंय.
पण, लग्नाबद्दल विचारलं असता भविष्यात जवळपास तरी कुठेही लग्न करण्याची योजना नाही... आणि कदाचित असंही होऊ शकतं की तो कधीच लग्न करणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.