'दुनियादारी'ला 'लय भारी'ची मात, आता लक्ष्य 'टाईमपास'

लय भारी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत दुनियादारीचा रेकॉर्ड मोडला आहे. आता लय भारी टाईमपास सिनेमाचं रेकॉर्ड ब्रेक करणार का? यावर सर्वांक्ष लक्ष आहे.

Updated: Jul 27, 2014, 10:54 PM IST
'दुनियादारी'ला 'लय भारी'ची मात, आता लक्ष्य 'टाईमपास' title=

मुंबई : लय भारी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत दुनियादारीचा रेकॉर्ड मोडला आहे. आता लय भारी टाईमपास सिनेमाचं रेकॉर्ड ब्रेक करणार का? यावर सर्वांक्ष लक्ष आहे.

रितेश देशमुखची निर्मिती आणि अभिनय असलेल्या 'लय भारी'ची  जोरदार कमाई चालू आहे. ११ जुलैला प्रदर्शित झालेल्या 'लय भारी'ने आतापर्यंत २७ कोटींचा गल्ला जमावला असून, 'दुनियादारी'चा रेकॉर्ड मोडला आहे.

आता या चित्रपटाचे लक्ष्य आहे ते म्हणजे रवी जाधवचा 'टाइमपास' चित्रपट. 

'टाइमपास'ने ३७ कोटींच्या कमाईचा रेकॉर्ड केलेला आहे. रितेशचा 'लय भारी' हा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे राहील. 

'टाईमपास' आणि 'दुनियादारी' या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला होता. 

सिनेमंत्र, मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला 'लय भारी' हा चित्रपट पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून दाखवण्यात आला. 

मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिवसाला १५०० शो दाखवण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.