मुंबई : करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमाच्या रिलीजवरुन सुरु असलेल्या वादात आता दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी उडी घेतलीये.
बॉलिवूडला नेहमीच टार्गेट केलं जातं. बॉर्डरवरची घुसखोऱी बंद झाली नाही, मग बॉलिवूड टार्गेट का? आपलं पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू नाही तर मग सिनेमा टार्गेट का केला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
तसेच सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला परवानगी दिल्यानंतर सिनेमाचं रिलीज होणं कुणी कसं काय रोखू शकतं, तोडफोड कसं करू शकतं, असं म्हणत नसरुद्दीन यांनी मनसेवर टीका केलीय. तसंच करण जोहरला माफी मागायची गरज नव्हती, असंही ते म्हणालेत.