व्हिडिओ : अॅक्शन हिरो आणि लव्हर 'गुरु'!

अभिषेक बच्चनचा 'गुरु' तुम्ही पाहिलाच असेल... आता मराठीतही एक 'गुरु' येतोय... आणि या गुरुचा चेहराही तुमच्यासाठी काही नवीन नाही.

Updated: Jan 1, 2016, 12:38 PM IST
व्हिडिओ : अॅक्शन हिरो आणि लव्हर 'गुरु'! title=

मुंबई : अभिषेक बच्चनचा 'गुरु' तुम्ही पाहिलाच असेल... आता मराठीतही एक 'गुरु' येतोय... आणि या गुरुचा चेहराही तुमच्यासाठी काही नवीन नाही.

होय, बरोबर ओळखलतं... अभिनेता अंकुश चौधरीला तुम्ही लवकरच एक प्रियकर आणि अॅक्शन हिरोच्या म्हणजेच 'गुरु'च्या भूमिकेत पाहणार आहात. 

'दुनियादारी'फेम संजय जाधव यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. अंकुशसोबत या सिनेमात उर्मिला कानेटकर हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. २२ जानेवारी २०१६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय... पाहा तर मग...

व्हिडिओ पाहा :-