शाहरुख बॉलीवूडमधून रिटायर होतोय?

बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान बॉलीवूडमधून रिटायर होण्याचा विचार करतोय का?..शाहरुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिलेत. तसेच दुसरीकडे शाहरुखचा मुलगा आर्यनचेही बॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा रंगल्यात

Updated: Jan 1, 2016, 12:19 PM IST
शाहरुख बॉलीवूडमधून रिटायर होतोय? title=

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान बॉलीवूडमधून रिटायर होण्याचा विचार करतोय का?..शाहरुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिलेत. तसेच दुसरीकडे शाहरुखचा मुलगा आर्यनचेही बॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा रंगल्यात

शाहरुख आपल्या आगामी 'फॅन' या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख डबल रोल करणार आहे. या चित्रपटाबाबत तो खूपच उत्साही आहे. १५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 

या फॅनच्या प्रमोशनदरम्यान शाहरुखला काही प्रश्न विचारण्यात आले. फॅन या चित्रपटाद्वारे तुला अधिक पुरस्कार मिळण्याची आशा आहे का? असे त्याला विचारले असता, मी एका राष्ट्रीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मी रिटायर होणार असल्याचे शाहरुख म्हणाला. 

शाहरुखने आतापर्यंत ८०हून अधिक चित्रपटात काम केलेय. आतापर्यंत १४ फिल्मफेअर पुरस्कारांसह त्याने अनेक पुरस्कारही मिळवलेत. मात्र अद्याप त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.