'बाहुबली'च्या सिक्वेलमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित?

बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाण करणाऱ्या बाहुबली चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलमध्ये बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिसणार असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये जोराची सुरू आहे. 

Updated: Oct 30, 2015, 09:31 PM IST
'बाहुबली'च्या सिक्वेलमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित? title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाण करणाऱ्या बाहुबली चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलमध्ये बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिसणार असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये जोराची सुरू आहे. 

बाहुबलीच्या सिक्वेलचे येत्या महिन्यात चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटात राजघराण्याची राणी कुंतला हिच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित हिची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  याबाबत माधुरीला विचारले असता तीनेही आपल्याला या चित्रपटात काम करण्यास आवडेल असे म्हटल्याचे सुत्रांकडून समजते. 

तर दुसरीकडे अशीही चर्चा होत आहे की, या चित्रपटात राणी कुंतलाच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित हिच्या ऐवजी अभिनेत्री विद्या बालन हिचीही निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
  
गेल्या जुलै महिन्यात देशभर  बाहुबली चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सुपरस्टार प्रभास, राणा दगुबती,  अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया, रम्या कृष्णन, सत्यराज, नासिर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.