मुंबई : महेश टिळेकर निर्मित मराठी तारका या कार्यक्रमाचा पाचशेवा प्रयोग मुंबईत पार पडला.
अमृता खानविलकर, श्रुती मराठे, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, वर्षा उसगावकर अशा अऩेक तारकांनी एकाहून एक बहारदार नृत्य सादर केली.
पाचशेव्या प्रयोगाला श्रीदेवीची उपस्थिती होती. तर पाठोपाठ धकधक गर्ल माधुरी दीक्षितने यावेळी खास हजेरी लावली.
मराठी तारकांच्या या बहारदार नृत्याला दाद देत मराठी माणसात टॅलेन्ट असतंच असतं असं म्हणत माधुरीने चाहत्यांच्या आग्रहाखातर खास नृत्याची झलकही पेश केली.
पाहा या कार्यक्रमाची झलक... येत्या दिवाळीत हा कार्यक्रम झी टॉकिजवर प्रदर्शित होणार आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.