कराची : आफताब शिवदासानी आणि तुषार कपूर स्टारर बॉलीवूडची अॅडल्ट कॉमेडी फिल्म 'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने निर्णय घेतला की हा चित्रपट जनतेच्या पाहण्यास लायक नाही.
केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड आणि प्रांतीय सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यासारखा नाही.
सीबीएफसी प्रमुख मुबाशीर हसन म्हणाले, की हा चित्रपट खूपच अश्लील आहे. यात खूपच घाण आणि लज्जास्पद डायलॉग आहेत.
हसन म्हणाले, या चित्रपटाने लाजेच्या सर्व सीमा तोडल्या आहेत. त्यात कामुकता आणि घाण डायलॉग आहेत.
या चित्रपटाला अॅडल्ट कॅटेगरीत ठेवूनही प्रदर्शीत करू शकत नाही.