नवी दिल्ली : अभिनेता ऋषी कपूर आपल्या बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असतात. आत्ताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे कतरिनाला अजूनही कपूर कुटुंबीयांच्या मनात स्थान मिळवायला वेळ लागेल असंच दिसतंय.
मुलगा रणबीर कपूर आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्ये असले तरी कतरीना मला 'पापा' म्हणण्याची हिंमत करणार नाही, असं ऋषी कपूर यांनी म्हटलंय.
'एका वर्तमानपत्रानं कतरिनानं आता मला 'पापा' म्हणायला सुरुवात केल्याची बातमी छापलीय... हे सगळं बकवास आहे... ती मला 'पापा' म्हणायची हिंमत करू शकत नाही. मला नेहमीच का त्यांच्या (रणबीर-कतरिना) खाजगी जीवनात खेचलं जातं? मी काही प्रश्नांपासून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यापैंकी नाही' असं ऋषी कपूर यांनी म्हटलंय.
राहिला प्रश्न माझा, तर कतरिना खूप चांगली वर्तवणूक असणारी मुलगी आहे. मी तिच्यासोबत 'नमस्ते लंडन'मध्ये काम केलंय, असंही यावेळी त्यांनी म्हटलंय.