'कबाली'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

दी सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'कबाली' या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच छप्परतोड कमाई केलीये. या चित्रपटाने जगभरात तब्बल ५५ कोटींचा गल्ला जमवलाय.

Updated: Jul 23, 2016, 01:35 PM IST
'कबाली'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई title=

मुंबई : दी सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'कबाली' या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच छप्परतोड कमाई केलीये. या चित्रपटाने जगभरात तब्बल ५५ कोटींचा गल्ला जमवलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात या चित्रपटाने ४० कोटींचा गल्ला जमवलाय. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांत 'कबाली'ने पहिल्याच दिवशी १२.९३ कोटींचा गल्ला जमवला. विदेशात इतकी जबरदस्त कमाई करणारा कबाली पहिला सिनेमा ठरलाय.

तब्बल १२ हजार स्क्रीनवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. प्रदर्शनापूर्वीच 'कबाली'चे वीकेंडपर्यंतचे सर्व शोज हाऊसफुल्ल होते.