मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर सोबत अनेक चित्रपटात काम करणारी बॉलिवूड स्टार जुही चावलाने आश्चर्यकारक विधान केले आहे. एका मुलाखतीत म्हटले की 'आमिर भले ही सीधे-सादे दिखते हैं पर वे हैं बड़े शैतान'।
मीडिया रिपोर्ट्सनुसार आपला चित्रपट 'चॉक अँड डस्टर'च्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. या संदर्भात एक दाखला देताना जुहीनं आपल्या १९९०मध्ये आलेला चित्रपट 'तू मेरे हो' च्या शुटींगवळी झालेल्या घटनेबद्दल सांगितले. मला सापांपासून खूप भीती वाटते. एक दिवशी कुठून तरी आमिरने साप पकडून आणला आणि माझ्यामागे साप घेऊन तो पळत होता, अशी आठवण यावेळी तिनं सांगितलीय.
आमिर दिसायला खूप साधा वाटतो पण तो खूप खोडकर आहे, असेही जुहीने यावेळी सांगितले.
आमिर आणि जुही यांनी 'हम हैं राही प्यार के', 'कयामत से कयामत तक', 'दौलत की जंग', 'इश्क' या हिट चित्रपटात काम केले आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलंय.
सध्या आमिर 'दंगल' चित्रपटाची शुटिंग करत असून त्याच्यासोबत कहानी घर घर की फेम साक्षी तन्वर काम करीत आहे.