'फितूर'साठी कतरिनाच्या केसांसाठी खर्च... फक्त ५५ लाख रुपये!

कतरीना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'फितूर' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालाय. परंतु, यापूर्वी या फिल्ममध्ये कतरिनाच्या उधळपट्टीच्या अनेक चर्चा सुरू आहेत. 

Updated: Jan 28, 2016, 11:57 AM IST
'फितूर'साठी कतरिनाच्या केसांसाठी खर्च... फक्त ५५ लाख रुपये! title=

मुंबई : कतरीना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'फितूर' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालाय. परंतु, यापूर्वी या फिल्ममध्ये कतरिनाच्या उधळपट्टीच्या अनेक चर्चा सुरू आहेत. 

या सिनेमातील कतरिनाचा अंदाज आणि लूक सगळ्यांचंच  लक्ष वेधून घेणारा आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात कतरनाच्या केसांचा रंग यामध्ये थोडा हटके दिसतोय. पण, हा हटके लूक मिळवण्यासाठी थोडेथिडके नाही तर तब्बल ५५ लाख रुपये खर्च करण्यात आलेत. 

कतरिनाच्या हेअर हायलायटिंगचं काम लंडनमध्ये करण्यात आलंय. यासाठी तिला अनेकदा लंडनच्या वाऱ्या कराव्या लागल्या. यावेळी तिनं फर्स्ट क्लास फ्लाईटनं प्रवास केला. सोबत तिचा मॅनेजरही असायचाच. सोबत फाईव्ह स्टार हॉटेलही आलंच... असा सगळा हिशोब केला असता केवळ केसांसाठी कतरिनानं ५५ लाख रुपये खर्च केल्याचं उघड झालंय.