इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप

रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे. 

Updated: Jan 15, 2016, 09:01 PM IST
इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप title=

मुंबई : रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे. 

रणबीर आणि कतरिना संदर्भात सर्व प्रकारच्या बातम्या आपल्या ऐकाला मिळाल्या. सुरूवातीला त्याचं सूत जुळलं, त्याचे लग्न ठरले आणि नंतर बातमी आली त्यांचे ब्रेकअप झाले. या हेडलाइन्स अनेक प्रसार माध्यमात झळकल्या. आता आपल्या ऐकाला मिळते आहे की दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दोन दिवसापूर्वी रणबीर शिफ्ट झाला आहे. 

या संदर्भात मिस मालिनी डॉट कॉम या वेबसाइटने बातमी दिले आहे. कपूर कुटुंबियाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार रणबीर कपूर आपल्या आईवडिलांसोबत राहायला आला आहे. 

त्याने कार्टर रोड येथील घर सोडले असून तो हिल रोड वरील विल्सन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. कतरिना अजूनही सिल्व्हर स्टँड येथे राहत आहे. 

आता काही दिवसात ऋषी कपूर आणि नीतू सिंग काही दिवसात विल्सन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे.