जयंती वाघधरे, मुंबई : आज बिग स्क्रीनवर बीग बी अमिताभ बच्चन स्टारर 'तीन' हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय.
यात अमिताभ बच्चनसोबतच अभिनेत्री विद्या बालन आणि नवाज्जुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. साऊथ कोरियन सिनेमा 'मोंटाज' या सिनेमाचा हा रिमेक आहे. पिकू या सिनेमानंतर पुन्हा एकदा अमिताभ नेहमीपेक्षा काहीतरी हटके साकारताना दिसणार आहेत.
ही गोष्ट आहे एका आजोबाची... आपल्या पत्नी आणि नातीसोबत तो सुखानं आयुष्य जगत असतो... अचानक एक दिवस त्याची नात किडनॅप होते. आपल्या नातीला वाचवण्यासाठी तो जवळ जवळ सगळे प्रयत्न करतो पण अखेर तो तिला वाचवू शकत नाही. यानंतर सुरु होतो त्याचा लढा... खूनीला शोधण्यासाठी तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. त्यानंतर काय घडतं, हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण हाच तर खरा सिनेमा आहे. तीन हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे, जो तुमचं बऱ्यापैंकी मनोरंजन करतो.
'पिकू' या सिनेमात अभिनयाचा एक बेन्चमार्क सेट केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन आता तीन या सिनेमातही एक वेगळा प्रयोग करताना दिसतायेत... 'पिकू'मध्ये एक हट्टी, अल्हड, आपले प्रिन्सिपल्स फॉलो करणाऱ्या वडिलांच्या व्यक्तिरेखेत आपण त्यांना पाहिलं... 'तीन' या सिनेमात ते एका हतबल तरी जिद्दी अशा आजोबांच्या भूमिकेत दिसत आहेत.
खरंतर हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला 'वजिर' या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही... कारण वजिर या सिनेमामध्ये त्यांच्या मुलीच्या खूनीच्या शोधात ते दिसतात... तर 'तीन'मध्ये ते आपल्या नातीच्या खूनाचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात दिसतात.
पुन्हा एकदा बिग बी अमिताभ यांनी या सिनेमात अभियाचा एक वेगळाच बेन्तमार्क सेट केलाय. त्यांचे संवाद, त्यांची बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरचे भाव, त्यांचा अभिनय कमाल झालाय. आपल्या नातीवर जिवापाड प्रेम करणारा आजोबा त्यांनी उत्तम पार पाडलाय.
सिनेमात अमिताभसोबत नवाजुद्दीनचे अनेक सीन्स आहेत, पण कुठेतरी सिनेमा पाहिल्यावर नवाजच्या रोलला फार महत्त्व देण्यातच आलं नाहीय, हे जाणंवतं. त्याच्यासारख्या एका ताकदीच्या नटाचा सिनेमात हवा तसा वापर करण्यात आला नाही. म्हणूनच कदाचिल नवाज सिनेमाच्या प्रमोशनमधूनही गायब होता.
अभिनेत्री विद्या बालन 'तीन' या सिनेमात एका पोलीस ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत दिसते. तिची भूमिका लहान असली तरी महत्त्वाची आहे, तिनंही ती चोख पार पाडली आहे.
'तीन' या सिनेमाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा जास्त इंटरेस्टींग वाटतो. कारण इंटरवलनंतर सिनेमा होल्ड करतो. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी सिनेमाची मांडणी चांगली केली असली तरी 'तीन' या सिनेमाचा पेस, ती स्पीड कुठेतरी मिसिंग वाटते.
हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही या सिनेमाला देतेय ३ स्टार्स...