घ्या जाणून... या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्यात अव्वल

अधिकाधिक टीआरपी मिळवण्यासाठी विविध चॅनेलवरील मालिकांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. 

Updated: Jun 10, 2016, 11:00 AM IST
घ्या जाणून... या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्यात अव्वल title=

मुंबई : अधिकाधिक टीआरपी मिळवण्यासाठी विविध चॅनेलवरील मालिकांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. 

बार्क इंडियाने नुकतीच या आठवड्यातील अव्वल पाच मालिकांची यादी जाहीर केलीये. यात झी मराठीवरील तीन आणि कलर्स वाहिनीवरील दोन मालिकांचा समावेश आहे. 

पहिल्या तीन स्थानावर झी मराठीच्या मालिका आहेत. निलेश साबळेचा चला हवा येऊ द्या हा शो अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी नील आणि स्वानंदी यांची नांदा सौख्य भरे ही मालिका आहे. 

लग्नासाठी पत्रिका नव्हे तर मनं जुळावी लागतात हे सांगणारी पसंत आहे मुलगी ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी गणपती बाप्पा मोरया आणि पाचव्या स्थानी संत तुकाराम आणि त्यांच्या पत्नी आवली यांची संसारगाथा दाखवणारी तू माझा सांगाती मालिका पाचव्या स्थानी आहे.