स्वतःला सिद्ध करण्यासाठी बॉलिवुडमध्ये : सनी लिऑन

बॉलिवूडमध्ये जिम्स २ आणि रागिनी एमएमएस २ या सारख्या सारख्या सिनेमात काम करणारी सनी लिऑन आता दक्षिणेकडील चित्रपटात आयटम साँग करताना दिसते. मात्र, आपण बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेय, असे पॉर्नस्टार सनी लिऑन हिने म्हटले आहे.

Updated: Jul 21, 2014, 01:47 PM IST
स्वतःला सिद्ध करण्यासाठी बॉलिवुडमध्ये : सनी लिऑन title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये जिम्स २ आणि रागिनी एमएमएस २ या सारख्या सारख्या सिनेमात काम करणारी सनी लिऑन आता दक्षिणेकडील चित्रपटात आयटम साँग करताना दिसते. मात्र, आपण बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेय, असे पॉर्नस्टार सनी लिऑन हिने म्हटले आहे.

मी हिंदी सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध करणार आहे. त्यासाठीच मी आले आहे. माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत जे झाले आहे, त्याबाबत मी खूश आहे. बॉलिवूडमध्ये अनेकांचा मला पाठिंबा मिळत आहे. ही बाब माझ्यासाठी चांगली आहे. मी डबिंग स्वत:च करीत आहे, असे ती सांगते.

आयटम साँगबाबत ती सांगते, टी-सीरीजबरोबर माझ्या चांगले संबंध आहेत. त्यांनी या गाण्याबाबत मला विचारले त्यावेळी मी त्यांना होकार दिला. आपल्या चाहत्यांचा वाटा महत्वाचा आहे. तसेच बॉलिवूडमध्ये आल्याने मला बरे वाटत आहे. त्यामुळे मी इथे आहे आणि यापुढे इथे राहणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.