सलमान पहिल्यांदा दिसणार 'किस' करताना

Updated: Jul 18, 2014, 09:03 PM IST
सलमान पहिल्यांदा दिसणार 'किस' करताना title=

मुंबई : 'किक' चित्रपटातील 'जुम्मे की रात' या गाण्यामध्ये सलमान खान पहिल्यांदा आपल्याला किस करताना दिसणार आहे. आतापर्यंत सलमान ऑन स्क्रिन कोणत्याही अभिनेत्रीला किस केलेले नाही. आम्ही ऑन स्क्रिन म्हणतो आहे.....  

सध्या हे गाणं फारच गाजतंय. या संदर्भात चर्चा अशी आहे की, किक या चित्रपटात सलमान आणि जॅकलिनने लिप-लॉक सीन शूट केलाय. सलमानने आतापर्यंत अनेक बॉलीवुड अभिनेत्रींना डेट केलंय पण चित्रपटात कधी किस नाही केलं. कदाचित किक या चित्रपटाला हिट करण्यासाठी सलमानने स्वतःचाच रेकॅार्ड तोडला असेल.

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या 'किक' हा चित्रपट एका तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. साजिद नाडियाडवालाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रणदीप हुड्डाने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट येत्या 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.