लग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच- कतरिना

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. आता तर खुद्द कतरिना कैफनंच या चर्चांना उत्तर दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता असं कतरिना म्हणाली आहे.

Updated: Jan 31, 2016, 05:02 PM IST
लग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच- कतरिना title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. आता तर खुद्द कतरिना कैफनंच या चर्चांना उत्तर दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता असं कतरिना म्हणाली आहे.

तसंच माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरु असलेल्या चर्चा ऐकून मला दु:ख होतं अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. आपलं काम आणि करियर याबाबत चर्चा व्हावी अशी प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते, पण याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा होते. अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे.

 

रणबिर सोबतच्या तिच्या ब्रेक अपवर मात्र तिनं थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता, तसंच मी अजून एन्गेज नाही, असं कतरिना म्हणाली आहे.