मुंबई : जसीम खान यांनी सलमान खानचं 'बिइंग सलमान' या जीवनावर आधारित पुस्तकात सलमान विषयी चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयांचा समावेश करण्यात आलाय. यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे सलमान खान आणि त्याच्या गर्लफ्रेंड्स.
जसीम खान यांच्या मते सलमानच्या गर्लफ्रेंड्सनी त्याचा पुरेपूर वापर करुन घेतला आणि नंतर त्याचावर आरोप लावले. यातील बहुतांश आरोप खोटे होते. पण, प्रसारमाध्यमांतून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि सलमानविषयी सर्वात जास्त गैरसमज समाजात निर्माण झाले, असं त्यांचे म्हणणे आहे.
सलमानच्या गर्लफ्रेंडस आणि त्यांनी केलेले आरोप
संगीता बिजलानी - संगीता सलमानची पहिली गर्लफ्रेंड होती. पण, सलमानने तिला काही काळानंतर धोका दिला अशा बातम्या आल्या होत्या. यानंतर संगीताने खुलेपणाने बोलून दाखवले होते. सलमानने सुद्धा आपल्याला या गोष्टीचा पश्चात्ताप झाल्याचे नंतर अनेकदा बोलून दाखवले होते.
सोमी अली - सोमी अली आणि सलमान खान ९०च्या दशकात एकमेकांच्या जवळ आले. पण, सोमीला त्याची दारुची सवय फारशी आवडत नसे. दारू प्यायल्यानंतर सलमान भान हरवून बसायचा. त्याने एकदा दारुच्या नशेत झालेल्या वादावादीनंतर तिला बाटली फेकून मारली होती आणि नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. तिला तो नेहमी मारझोडही करत असे.
ऐश्वर्या राय - ऐश्वर्या सलमानच्या आयुष्यात आली आणि सोमी अमेरिकेला निघून गेली. ऐश्वर्यानेही सलमानने तिच्याशी नेहमी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. सलमान तिला मारझोड करत असल्याच्या चर्चाही नेहमी रंगल्या होत्या.
कतरिना कैफ - कतरिना आणि सलमान रिलेशनशीपमध्ये असल्याचे दोघांनी मान्य केले नसले तरी ते नेहमी एकत्र दिसायचे. ती सलमानच्या कुटुंबीयांच्याही फार जवळ आली होती. पण, 'एक था टायगर' चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांच्यात झालेल्या वादानंतर सलमानने तिच्यावर हात उगारला होता. यानंतर मात्र कतरिनाने सर्व काही थांबवण्याचा निर्णय घेतला.