मुंबई: बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशननं पोपबरोबरच्या अफेअरबाबत केलेल्या ट्विटवरून दिलगिरी व्यक्त केली आहे. पोपबद्दल मी केलेल्या ट्विटमुळे भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ट्विट ऋतिकनं केलं आहे.
Seems my tweet about His Holiness has led 2misunderstanding. My apologies 4 hurt caused 2religious or other sentiments. Was unintentional.
— Hrithik Roshan (@iHrithik) April 2, 2016
पोपबद्दल केलेल्या या ट्विटमुळे ख्रिश्चन संघटनांनी ऋतिकला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. तसंच माफी मागण्याची मागणीही केली होती. त्यावर आता ऋतिकनं दिलगिरी व्यक्त केली आहे.
ऋतिक आणि कंगनामध्ये सध्या वाद सुरु आहेत. कंगनानं ऋतिकचा उल्लेख सिली एक्स असा केला होता, त्यामुळे भडकलेल्या ऋतिकनं त्यापेक्षा मी पोपसोबत अफेअर करीन असं ट्विट ऋतिकनं केलं होतं. त्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला होता.