मुंबई : सलमान आणि त्याची गर्लफ्रेंड लूलिया यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा सध्या अधिक रंगतायत. अनेकवेळा या दोघाना एकत्र पाहिलेही आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या बर्थडे पार्टीत लूलिया दिसली होती. तसेचसलमान आणि लूलिया एकत्र शो होस्ट करणाऱ असल्याची चर्चाही होती.
मात्र अद्याप या दोघांनी त्यांच्यातील नाते जाहीर केलेले नाही. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सलमान सध्या लूलियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तो लूलियाला तिच्या नावाने हाक मारत नाही तर तो तिला प्रेमाने 'यू' असं म्हणतो.
लूलिया जेव्हा सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी भारतात आली होती तेव्हा ती सलमान राहत असलेल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्येही गेली होती. या वर्षी सलमान विवाहबंधनात अडकणार असल्याचेही म्हटले जातेय.