हिट अॅन्ड रन : सलमान खान सेशन कोर्टात दाखल

सलमान खान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे. 

Updated: May 20, 2015, 01:08 PM IST
हिट अॅन्ड रन : सलमान खान सेशन कोर्टात दाखल title=

मुंबई : सलमान खान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे. 

आज केवळ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सलमान सत्र न्यायालयात उपस्थित झालीय. जामीन प्रक्रियेनुसार आरोपीला जामीन राहणारी व्यक्ती आणि स्वत: आरोपी न्यायालयात हजर राहाणं आवश्यक आहे. 'बिईंग ह्युमन' या संस्थेच्या मॅनेजरपदी काम करणाऱ्या रेश्मा शेट्टी या सलमानला जामीन राहिल्या आहेत. 

त्यानुसार सलमान आज न्यायालयात आला आहे. हिट अँड रन प्रकरणी ६ मे रोजी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सलमाननं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर ८ मे रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सलमानला नव्यानं जामीन देत, सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. या प्रकरणाची पुढली सुनावणी १५ जूनला होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.