निकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका केली... हा निकाल ऐकताच सलमान गहिवरला आणि त्याच्या भावना त्याच्या अश्रुंतून व्यक्त झाल्या. 

Updated: Dec 10, 2015, 02:46 PM IST
निकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला! title=

मुंबई : 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका केली... हा निकाल ऐकताच सलमान गहिवरला आणि त्याच्या भावना त्याच्या अश्रुंतून व्यक्त झाल्या. 

या निकालासाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, सलमान एक वाजल्याच्या सुमारास सलमान कोर्टात हजरही झाला. खालच्या कोर्टात ५ वर्षांची शिक्षा सलमानला सुनावण्यात आली होती, त्याच्या अगदी विरुद्ध निकाल हायकोर्टात ऐकायला मिळाला आणि सलमानला रडूच आलं... तो हमसून हमसून रडताना पाहून मित्र मंडळी आणि नातेवाईकांनी सलमानला धीर दिला. 

अधिक वाचा - सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय

या निकालासाठी सलमानच्या बहिणी अलविरा, अर्पिता, बॉडिगार्ड शेरा अगोदरच कोर्टात उपस्थित झाल्या होत्या. निकाल ऐकताच अलविरानं मॅनेजर रेश्माला घट्ट मिठी मारली... आणि दोघींनीही रडून आपला आनंद व्यक्त केला. सलमानचा निकाल जाहीर होत असताना या दोघीही दररोज कोर्टात पाहायला मिळत होत्या. मीडियासमोरही अलविरानं 'थम्स अप' दाखवत या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

अधिक वाचा - 'रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही'

न्यायालयानं बांद्रा पोलिसांना सलमान खानचा पासपोर्ट त्याच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत. या निकालानंतर सलमाननं वकील अमित देसाईसह आपल्या संपूर्ण डिफेन्स टीमची भेट घेतली. 

अधिक वाचा - सलमान हिट अॅन्ड रन : दारुबिल पुरेसा पुरावा नाही : कोर्टाचे निरीक्षण 

पोलीस आणि सरकारी पक्षानं मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.