'जॉली एलएलबी-2'ला हायकोर्टाचा हिरवा कंदील

अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी-2 च्या प्रदर्शनावरील टांगती तलवार हायकोर्टाने उठविली आहे.

Updated: Feb 6, 2017, 04:55 PM IST
'जॉली एलएलबी-2'ला हायकोर्टाचा हिरवा कंदील  title=

औरंगाबाद : अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी-2 च्या प्रदर्शनावरील टांगती तलवार हायकोर्टाने उठविली आहे. या चित्रपटात कोर्टाचा अवमान करणारी दृश्यं असल्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडापीठात करण्यात आली होती.

मात्र आता या सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य वगळून सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी हायकोर्टाने हिरवा कंदील दिला आहे. यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळाला असून 10 फेब्रुवारी रोजी जॉलीएलएलबी 2 प्रदर्शित होणार आहे.