'डूडल'वर सदाबहार नर्गिसला आदरांजली...

भारत सरकारद्वारे दिला जाणारा 'पद्मश्री' अवॉर्ड पहिल्यांदा ज्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला त्या अभिनेत्री नर्गिस यांचा आज 86 वा वाढदिवस... हाच दिवस 'गूगल डूडल'नंही आपल्या पद्धतीनं साजरा केलाय.

Updated: Jun 1, 2015, 02:48 PM IST
'डूडल'वर सदाबहार नर्गिसला आदरांजली...  title=

मुंबई : भारत सरकारद्वारे दिला जाणारा 'पद्मश्री' अवॉर्ड पहिल्यांदा ज्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला त्या अभिनेत्री नर्गिस यांचा आज 86 वा वाढदिवस... हाच दिवस 'गूगल डूडल'नंही आपल्या पद्धतीनं साजरा केलाय.

1958 मध्ये अकॅडमी अवॉर्डससाठी निवडण्यात आलेला 'मदर इंडिया' हा पहिला चित्रपट होता. या सिनेमाला 'फॉरेन फिल्म' कॅटेगिरीत ठेवण्यात आलं होतं. 

याशिवाय, नर्गिस यांना 1980 मध्ये राज्यसभेतही सन्मानीत करण्यात आलं होतं. परंतु, कॅन्सरमुळे कमी वयातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

आज कोमत्याही बॉलिवूड सिनेमाला 'बेस्ट फिचर फिल्म'चा नॅशनल अॅवॉर्ड दिला जातो, तो 'नर्गिस दत्त अॅवॉर्ड'च्या नावानंच दिला जातो.

नर्गिसनं आपल्या खाजगी जीवनात अभिनेता सुनील दत्त यांच्याशी विवाह केला. अभिनेता संजय दत्त, खासदार प्रिया दत्त आणि नम्रता दत्त ही त्यांची मुलं... 

आठवणीतलं एक गाणं... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.